Wednesday 7 December 2022

कुंद -

 

कुंद -


कुंद -

पडताच थेंब खाली, होती सहस्र कणिका

विखरून पांगताती, सार्‍या धरेवरी ह्या

तैसाच शुभ्र तारा, निखळून ह्या नभीचा

आला कधी असावा, भेटावया धरेला

 

कुंदावरी उतरता, झाल्या सहस्र कलिका

शततारका नभीच्या, कुंदावरी बरसल्या

होताच सांज थोडी, त्या तारका चिमुकल्या

होउन फुले कळ्यांची, कुंदावरी उमलल्या

 

आकाश पांघरूनी, अनमोल तारकांचे

हा धुंद कुंद बोले, प्रतिबिंब मी नभाचे

माझ्याच दर्पणी ह्या, डोकावुनी पहाती

किति चांदण्याच हसर्‍या, छबि गोड ती स्वतःची

-------------------------------------------

#लेखणीअरुंधतीची-


No comments:

Post a Comment