Monday 5 December 2022

तमतृष्णा

 

तमतृष्णा


से शांत तम गडद भोवती । दुलईसम वेढून मला

अनन्यभावे कुशीत त्याच्या । करते मी स्वाधीन मला

 

नकोत स्वप्ने सैरभैर ती । नीज कशी येईल मला

 नकोच गलका उशास माझ्या । नाद विसंगत जगताचा

 

 नीज अशी येता ही उत्कट । देह लवंडे भान न त्या

निद्रादेवी कुशीत घेता । गाढ झोप लागेचि मला

 

रवी घेऊनी रजा म्हणे मज । दिन एक अजुन हा मावळला

संध्या तारा म्हणेचि हसुनी । भेटू पुढच्या मुक्कामा

 

खिडकी मधुनी चंद्र डोकवत । स्मित वदनाने वदेचि हा

केसांमधुनी हात फिरवुनी । असशिल दमली, झोप जरा

 

निरव रवाचा आकाशीच्या । श्रुतीच घेती शोध पुन्हा

ले होते त्या गावाचा । मार्ग दिसू लागे मजला

 

ओठीचे हरिनाम विरावे । तमात अलगद हळूच ह्या

नजर विरावी तमी दाट ह्या । घेत शोध अदृश्याचा

 

अपार शांती शोषुन घेवो । मंद मंद रव हृदयाचा

आस लागली पापण्यांस ही । उतरावे खाली आता

 

झंझावातचि आयुष्याचा । म्हणे कुठे टेकवु माथा

उफाळते वेगाने उत्कट  । सर्वांगी ही तमतृष्णा

--------------------------------------

लेखणी अरुंधतीची -

 

 

 

 

No comments:

Post a Comment