Wednesday 7 December 2022

पानगळ

 



पानगळ 

 

फुलांचा ऋतु संपतो, फळांचाही संपतो. लाल, पिवळी, केशरी फुलं गळून पडतात, फळंही काढून घेतली जातात. चैतन्यानी आणि विविध चमकदार रंगांनी डवरलेलं झाड परत अति सामान्य होऊन जातं.  आपल्याच फुलाफळांच्या रंगांच्या आठवणींनी बेचैन झालेलं झाड आपल्या शिशुंच्या रंगस्वप्नांना हृदयाशी धरून उचंबळून येतं. त्यांच्याच स्वप्नात अखेरचं जीवन व्यतीत करतं.

 

 

सांडता फुलांचे रंग, आरक्त शेंदरी पिवळे

झेलले पर्णराजीने, करुन द्रोण हृदयांचे

 

शैशव शिशुंचे गोड, ती त्यांचीच रंगस्वप्ने

कधि मातीत ना मिळावी, म्हणुनीच पर्ण झटले.

 

सोडून रंग अपुले , ते हिरव्या छटा छटांचे

त्यजुनीच काम नेमाचे, शिशुरंगस्वप्न जगले

 

चिमटा बसे जरी हो, किति उदरास पालकांच्या

अन मिटलेच जीवन तरी, शिशुरंग सोबतीला

 

पडती जरी गळोनी, ती मातीत सर्व पाने

मृदु रंग ताज्या फुलांचे, जपतीच चित्तभावे

-----------------------------

लेखणी अरुंधतीची -

 

 

No comments:

Post a Comment