Wednesday 7 December 2022

कवडसा

 

कवडसा

येइ कुठुनसा एक कवडसा

काळोखातचि किति लहानसा

असेल नखभर त्याची व्याप्ती

परि आकर्षित करे कशी ती

 

ओघळला का असेल मोती

चमकदार का पडली शुक्ती

एक विलक्षण ओढ लागली

तमी दिसे हे काय खालती

 

काय सांडले जमिनीवरती

हाताने चाचपडे धरा ती

हाताला ना लागे काही

परी कवडसा बोटांवरती

 

छिद्रातुन मज हसे चंद्र तो

तुला भेटण्या आलो होतो

अंधारातच उचल लेखणी

चंद्रकांति तव बोटांवरती

…………………

लेखणी अरुंधतीची-


 

No comments:

Post a Comment