Wednesday 7 December 2022

नववर्ष

 

नववर्ष

 

बलाकमाला वर्षांची ही । उडत राहते सदा

काळरूप ह्या नभात लवलव । विहरत जाते सदा

 

सरत्या वर्षांची ह्या उमटे । सुदीर्घ रेखा नभी

येणार्‍या वर्षांची जुळते । लेखा त्यासी दुजी

 

एकचि क्षण तो वर्तमान हा ।  सांधे लेखा दोन

गतीमान हे नव संवत्सर । बांधे भूत भविष्य

 

भूत भविष्याच्या दो पाखा । सद्य क्षणचि नेता

उडत चालला थवा मनोहर । बलाक-माले-समा

 

कुठून आली, कुठे चालली । कळे न कोणा कधी

वर्तमान हा कुठे चालला । दिशा घेत कोणती

 

अज्ञाताचे लक्ष्य भेदण्या । शर जातसे कोठे

माहित नाही कोणासी त्या । नाव धनुर्धराचे

 

परि उत्साहित होती सारे । पाहुन त्याची गती

नयनरम्य ती बलाकमाला । हर्षित करिते मनी

---------------------------------------

लेखणी अरुंधतीची

No comments:

Post a Comment