Wednesday 7 December 2022

मोगरी –

 

मोगरी

एक मोगरी मोगरी । तिचा तोरा सर्वांवरी

कळ्या गुंफिल्या, मोकळ्या । करे प्रसन्न अंतरी ।। १

तिची इवलिशी कळी । गोल वाटोळी वाटोळी

तिले मोत्याची झळाळी । नटली डहाळी डहाळी ।। २

कुणी ल्यायले दागिने । त्याचे मोल कोण जाणे

परि नासिकेसी येता गंध । पुसे फुल माळिले कोण्याने ।। ३

--------------------------------

लेखणी अरुंधतीची -

No comments:

Post a Comment