नाक विरुद्ध
डोळे
(Nose versus Eyes-W.Cowper.)
एकदा नाक आणि डोळे ह्यांच्यात
झाली हमरी-तुमरी
मुद्दा होताच वादाचा
तसा सर्वांना
सुपरिचित
अन् जबरी
भांडणाचं कारण होत,
`चष्म्याची मालकी'!
वादावादी त्यांची
भलतीच विकोपाला
गेली
न्यायासाठी दोघांनीही
न्यायालयात
धाव घेतली
विरोधात एकमेकांच्या
तक्रार
ही दाखल केली
दोन जणांच्या
खंडपीठा
पुढे न्यायदानाचं
काम झालं
बहुश्रुत कानांनी
तेंव्हा
न्यायाधीशांचे
काम पाहिलं
करायला दोघांचीही
वकीली जिभ पुढे सरसावली
बोलण्यात होती भलतीच पुढे;
खूप होती शिकलेली
नाकाची करीत वकिली जिभ बोलली चुरुचुरु
``नाकावरतीच असतो चष्मा सांगेल साधं चिटपाखरु
माय लॉर्ड!
धरुन चष्मा हातात एकदा रचना पहा त्याची
खोबण असते त्याच्यामधे
नाकच्याच
रुंदीची
चष्म्याचा खोगिर नाकावरतीच
पक्का बसतो
नाकारिता कसे त्याला
नाकाच्याच
मालकीचा
तो!
परत बघा तपासून
मुद्दा
जरा वेगळ्या
प्रकारे
मांडते
अस्स पहा न्यायाधीश महाराज,
नाकच नसेल अस्तित्वात
तर चष्मा कुठे बसेल?
शंकाच नाही तिळभर चष्म्याच्या
मालकीची
माझ्या युक्तीवादाला
कोणीही
खोडुन काढणार
नाही!
मग पक्ष बदलून जीभ बोलली;
जे फक्त वकिलांनाच
जमतं
डोळ्यांच्याही बाजूने
तिने धीटपणे
आपलं मत मांडलं
आपलच पहिलं प्रतिपादन
तिने ठामपणे
खोडून काढलं
प्रतिपक्षाचे मत तिच्या
शब्दा शब्दातून
व्यक्त
झालं
खूप काही बचावाचं
बोलली पुरावे
सादर करुन
होता सडेतोड
युक्तिवाद
तिचा कायद्याला
धरुन
थोड्यांच लोकांना
माहित आहे युक्तिवादाचं
वक्तव्य
तिचं
न्यायालयानी मात्र आपले असमाधान
व्यक्त
केलं
गंभीर वाणीने
विचारपूर्वक
निकालात
काढत फिर्याद
निर्णायक आणि स्पष्टपणे
बोलले न्यायाधीश महाराज
किंवा नाही,
परंतु नाही स्वच्छ
होते विचार
करीत निकालपत्राचे वाचन सादर न्यायालयात
निकालात काढीत फिर्याद
न्यायाधीश महोदय बोलले,
``असेल दिवस उजेड अथवा दिवा कंदिल मंद
आता चष्म्याच्या
वादावरुन
होणार नाहीत द्वंद्व
जेंव्हा नाक वापरेल
चष्मा
,- -- --
जेंव्हा नाक वापरेल
चष्मा; -------------- तेंव्हा डोळे राहतील
बंद
!
------------------------------
अनुवाद – #लेखणीअरुंधतीची
No comments:
Post a Comment