Thursday, 10 August 2023

लहरी पाऊसराव

 

लहरी पाऊसराव

 

लहरी आहेत पाऊसराव

म्हणे बेडुक डराव डराव

आम्ही पाहतो यांची वाट

खुशाल जातात फिरवुन पाठ।।

 

सलामी द्यायला शेते ताठ

हे म्हणती,

``थांबा थोडं पहा वाट''!

दमुन शेतं जातात वाकुन

सवडीने हे येतात धावून।।

 

पर्स मध्ये असते छत्री

येणार नाहीत बाळगा खात्री

ऑफिस, शाळा भरता सुटता

धारांचा कारखाना चालू करता ।।

-----------

 

No comments:

Post a Comment