Thursday 10 August 2023

पावसावरील छोट्या 3 कविता -

 

ढग्गोबा 

पिऊन पाणी मोठ्ठ पोट

ढग्गोबांचा काळा कोट

जरतारीचा त्याला गोठ

सा र्‍यांना लागली यांचीच ओढ

-----------

 

वीज

ढगांच्या धक्काबुक्कीत

वीज बिच्चारी चेंगरली

काड कडाड आवाज करीत

मोडून जमिनीवर पडली

--------------

 

ढग

आकाशाच्या आखाड्यात

ढग ढोले उतरले

षड्डु ठोकत दंडांवर

धावून त्वेषात गेले।

 

वाटले जपानी त्सुमो

एकमेकांना भिडले

चितपट होउन सारे

माती धुळिला मिळाले

---------------------------------

#लेखणीअरुंधतीची- 

 

No comments:

Post a Comment