डोंगर आणि खार
(The Mountain and the Squirrel-R.W. Emerson)
मित्रांनो, ही कविता देण्यापूर्वी एक छोटीशी गोष्ट सांगायचीए. दामू धोत्रे नावाचे सर्कशीत काम करणारे प्रसिद्ध रिंगमास्टर होऊन गेले. माझ्या लहानपणी त्यांचं
`वाघसिंह माझे सखे सोबती' हे पुस्तक मला फार आवडायच. कित्तीवेळेला तरी वाचलं असेल मी.
दामू सर्कशीत सर्व जंगली प्राण्यांकडून काम करवून घेत. एका वेळेला 10-12 वाघ, 5-6 सिंह
10 -12 हत्ती दामू सांगतील तसं ऐकायचे. त्यांची आज्ञा पाळायचे. ह्या सर्व प्राण्यांना
शिकवणं सोप काम नव्हत, पण दामूंना प्राण्यांची आवडही होती आणि त्यांच्या वागण्याचं
बारीक निरीक्षण करण्याची नजरही होती. प्राण्यांच्या स्वभावाचा अभ्यास करून ते त्यांच्याकडून
वेगवेगळी काम करवून घेत.
त्यांच्याकडे एक काळा बिबट्या/जग्वार
(नक्की आठवत नाही) होता. तो शिकायला आला की
मधेच सर्कशीतल्या मधल्या रिंग भोवती उभारलेल्या पिंजर्यावर सरसर चढून जात असे. व काम करता करता मधेच पिंजर्याच्या जवळ जाऊन प्रेक्षकांकडे
पाठ करून पिंजर्यावर शू शू करून परत येत असे. त्याच्या ह्या दोन सवयी हेरून दामू धोत्र्यांनी
त्याच्या ह्याच दोन सवयींचा सर्कशीत मस्त उपयोग करून घेतला. पिंजर्यावर चढायला अवडणार्या
ह्या जग्वारला काम करता करता मधेच ते ` UP! ' म्हणून आदेश देत आणि तो काळा जग्वार सर
सर पिंज र्यावर
चढून जाई. त्याला अस चढतांना पाहून प्रेक्षकांच्या छातीत धस्स होई. अनेकांच्या पोटात
गोळा येई. पण सर्व प्रेक्षकांकडे सभोवार नजर फिरवून हे महाशय शांतपणे खाली उतरत. खेळ
संपला की त्यांनी आदेश देताच तो जिथे मुले
बसलेली असतील त्या बाजूला जाऊन त्यांच्याकडे पाठकरून पिंजर्यावर शू शू करून परत जात
असे. मुलांना त्याचे भारी कौतुक वाटे आणि त्या शूशू करणा र्या जग्वारला मुलांकडून
प्रचंड प्रतिसाद लाभे.
असे प्रत्येकातच प्राण्यात असो नाहीतर माणसात असो स्वभाववैशिष्ठ्ये असतातच.
प्रत्येक मुलामधे काही विशेष गुण असतातच. इतरांपेक्षा वेगळे. सगळेच वर्गात आणि शाळेत
पहिले येत नसले म्हणून काय झाल. त्यांला पालकांनी,
शिक्षकांनी थोडी दिशा द्यायचं काम करायला लागतं इतकच! त्याच्या ह्या सवयींवर नाराज
होऊन रागावण्यापेक्षा एक सकारात्मक दिशा आणि प्रोत्साहन हे पालकांनीच द्यायला हवे.
आत्ता सांगणार आहे ती कविताही अशीच
आहे. तशी बरीच जुनी आहे पण आजही मला फार आवडते. ही कविता मूळची इंग्रजी (The Mountain and the Squirrel-R.W.Emerson) मराठीत भाषांतर
करायलाही मजा आली.
(The Mountain and the Squirrel-R.W.Emerson)
एकदा डोंगर आणि खारीत कडाक्याचं भांडण झालं
`किरटुली खारटुली' म्हणुन त्यानी तिला
हिणवलं
अस्सेन मी किरटुली म्हणुन काय झालं?
अश्शील तू मोठा मी नाही क्का म्हटलं?
गोंडा उडवित शेपटीचा खारीनी उत्तर दिलं
उग्गाच काहीबाही बोलायचं तुला का शोभलं?
एवढा मोठ्ठा वाढलास तरी अक्कल ना बक्कल
काही बाही बोलतोस नुसती करतोस नक्कल!
नाही कुठे म्हणते मी? तुझ्याच अंगावर खेळते मी
सुंदर रस्ते सुंदर घर देतोस मला तूच नेहमी
पण डोंगरदादा डोंगरदादा,
सारे ऋतु सारे वर्ष सारी पृथ्वी सजविण्यासाठी
येतात सारे एकत्र त्यात मीही कुठे कमी नाही
आहेस तू भलामोठ्ठा कोणालाच शंका नाही
मी आहे जेवढी तेवढाही तू छोटा नाहीस
पण चपळपणात माझ्या तू पासंगालाही पुरत नाहीस
ठाण मांडून बसलास नुसताच हलायलाही जमत नाही
हं! एवढं मात्र आहे खरं, रान उचलून पाठीवर
राहणं उभं मला कधि जमणार नाही
पण डोंगरदादा डोंगरदादा ‚
देवानं त्याच्यासाठी माझी योजनाही केली नाही
असते वेगवेगळ्या क्षेत्रात प्रत्येकाचीच हुशारी!
माझ्या एकाच प्रश्नाचं उत्तर द्यायची आहे का तुमची तयारी?
डोंगरदादा डोंगरदादा एकदाच मला सांगा
जमतात का माझ्या सारख्या फोडुन खायला शेंगा?
डोंगरदादा डोंगरदादा तू आहेस जाड मी आहे रोड
पण जमतात का तुला फोडून खायला अक्रोड?
---------------------------------
#लेखणीअरुंधतीची -
No comments:
Post a Comment