Thursday, 10 August 2023

आंबे पिकले आज!

 

आंबे पिकले आज!

 कैर्‍यांच्या शेंड्या

लांब लांब लांब

धरून ठेऊन झाड म्हणे,

थांब थांब थांब !!!

 

वार्‍यासंगे उंच उंच

झुलु नका लांब

खोडकर वारा पाडेल तुम्हा

म्हणेलमी भोळा सांब!

 

इतक्यात नको टाकू अशी

एवढी मोठी ढांग

खाली पडताच पडेल खोक

मग काय करशील सांग ?

 

उतरवेल माळी एकेकाला,

तुमची आढीत लावेल रांग

पांघरून घालेल मऊ मऊ गवत

अंगावरती छान!!

 

अंगरखा हा हिरवाकंच

मुलायम हिरवा गार

देवाजीच्या जादूने

बदलून जाईल पार!!

 

रंग पालटेल होईल तलम

छटा येईल छान!

सोनेरीसर पिवळ्यावर

येईल तांबुस झाक

 

आढीत अस्सा दरवळेल

सुगंध गोड गोड खास

धावत येतील मुले सारी

म्हणतील ,

`` आज्जी! आंबे पिकले आज!''

------------------------

#लेखणीअरुंधतीची-


 

No comments:

Post a Comment