Thursday 2 March 2023

सोनचाफा

 

सोनचाफा

 

भृंगमोही सोनचाफा

सवे सुगंधाचा ताफा

फिरत राही बेवफा हा

करुन वार्‍याचा तराफा --- 1

 

दोन द्वारे पापण्यांची

हलकेच टाकी मिटवुनी

नजरेचिया लव ना पडे

नजरेस हा तो लवभरी ---2

 

श्वासरज्जुवरुन उतरे

हृद्महाली आमोद रे

नेतसे अनमोल मन हे

त्याच्यासवे त्याच्यासवे ---3

----------------------

 

No comments:

Post a Comment