मॅडम नॉट
नाऊ
इथ्थे इथ्थे उभी होते । हातात माझ्या खाऊ
बघता बघता घेऊन गेला । झाडावरचा
काऊ
इथ्थे इथ्थे उभी होते । गॅसपाशी पाहू
बघता बघता पातेल्यातून । दूध लागलं वाहू
आत्ता आत्ता केस माझे । होते दाट मऊ
कानी माझ्या
कुजबुजले
ते । वय लागलं होऊ
दातांनाही
आवडत होते । गुडदाणी
अन लाडू
डेंटिस्ट
म्हणे आता नको, खा । सूप लापशी मऊ
आत्ता आत्ता पाय माझे । म्हणत होते धाऊ
खूप झालं डॉक्टर
म्हणे ।
``मॅडम
नॉट नाऊ''
आत्ता आत्ता समोर होते । बाबा आई भाऊ
विचारे काळ हसुन कोठे । गेले सांग पाहू?
----------------------------------------------------------------
लेखणीअरुंधतीची-
No comments:
Post a Comment