Friday 9 June 2023

अनाम

 

अनाम

मोडल्या रोपास कोणी, काडिचा आधार देई

कोणि सुकल्या तरुवराला, अंजुलीभर अम्बु देई

 

पंख तुटल्या पाखराच्या, पंखात बळ भरतो कुणी

काळजी घेऊन त्याची, ‘‘घे भरारी’’! सांगे झणी

 

उचलुनी घेईच ओझे, त्या क्लांत पथिकाचे कुणी

हात धरुनी पार करवी, सुरक्षित त्या गर्दीतुनी

 

रांगत्या पडत्या शिशुस दे, बोट कोणी उठण्या वरी

क्षितिजाचीच रेघ होई, बसण्यास रविला क्षणभरी

 

हे दयेचे थेंब ठिपके, सांधून होय जी आकृति

लावण्यखणि मम माय ती, वात्सल्यमूर्ती पार्वती

-----------------

#लेखणीअरुंधतीची-

No comments:

Post a Comment