नृत्य शिकणार्या मुलीने मला भरतनाट्यम नृत्यातील "रुंडभारुंड"ची हस्तमुद्रा करून दाखली. आणि मला त्या काल्पनिक पक्ष्याचा फोटोही दाखवला. मला पंचतंत्रातील गोष्ट माहित होती. दोघींना नवीन माहिती मिळाली.
पक्षी होता एक तयाचे । नाव असे भारंड
दोनच होते पाय तयाला । दोनच होते पंख
दोन शिरे अन दोनचि माना।
पोट तयाला एक
दोन दिशांना तोंडे परि ती ।
भांडण त्यांचे नित्य
सागरतीरी हिंडत होता । भक्ष्याच्या शोधात
लाटांवरुनी तोच तरंगत । कुठलेसे आले फळ
एक चोच ती पकडे फळ ते । रसाळ अन् आकर्षक
पहिले मुख ते खाता वदले । स्वादिष्ट जणु अमृत
खाइन अर्धे देइन अर्धे । माझ्या मीच प्रियेस
दुजे तोंड ते वदे तयासी । मजला ही दे घास
रसाळ फळ ते कणभर मिळता । शमेल जिह्वालौल्य
सुखदुःखे ही एक आपुली । तृप्ती अपुली एक
परि दुर्लक्षुन दुजास तोची । वागे तसा खुशाल
फळ अर्धे ते खाऊन त्याने । दिले प्रियेसी खास
आनंदुन ती खाई फळ ते । दुजाकडे ना लक्ष
हिरमुसले मुख विरक्त झाले । सोसून तिरस्कार
परी अंतरी पेटुन उठले । घेऊ कसा प्रतिशोध
वेळ येऊ दे मग मी त्याला । दाविन इंगा थोर
एके दिवशी दिसली त्याला
। विषवल्ली ती
एक
लटकत होती फळे तियेला ।
जणु दुजेच हालाहल
विवेक सुटला त्याचा
पुरता । रागाने
तो अंध
तारतम्य ना तया राहिले
। झेपावे
त्वेशात
तोडुन घेता फळ चोचीने । दुजा करी आकांत
अविचाराने घडेल तुझिया ।
दोघांचाही
अंत
दुर्लक्षूनी तयास रागे । खाई फळ भारंड
एक यातना दोघांनाही
। तडफडती
ते मूर्ख
एकच होते भाग्य तयांचे
। अन मरण एकसाथ
आडमुठ्यांना देहांताची
। लिहिली शिक्षा एक
------------
मला विचारे
गोष्ट ऐकुनी । छोटी माझी नात
गोष्टी मधला वेडा पक्षी । आजी! आहे ना खोटाच?
नाही बाळे आजही आपण । वंशज ह्याचे थोर
जाती पाती धर्म वेगळे । परि देश आमुचा एक!
माहित आहे जरी अम्हासी । धरतो एकचि हट्ट
आणि भांडतो घेण्यासी जणु । नरडीचा का घोट
गिरवित कित्ता
भारंडाचा
। कधि न शहाणे होत
दोघांचाही अंत बरोबर ।
माहीत जरि हे सत्य!!
-------------------------------
#लेखणीअरुंधतीची
-