Tuesday 3 October 2023

मोहनमाळ

 

मोहनमाळ

8,8 - 8,3

कंठी माझ्या मोहन घाली, मोहक मोहनमाळ

तुझ्या नि माझ्या प्रेमाची ही, म्हणे खूण सांभाळ

बाहुपाश इंदीवर श्यामल, कंठी घालि खट्याळ

सतत रोखली नजरमालिका, निरखे मज गोपाळ

 

म्हणे धरेवर जाशिल तेव्हा, विसरशील मज खास

मला न बघशिल जरी असे मी, तुझा श्वासनिःश्वास

शकुंतलेची जशी हरवता, प्रीत-खूण पाण्यात

विसरे प्रियकर तिला तशी तू, विसरशील सहवास

 

परि कंठीची मोहनमाला, जपत रहा कंठात

आठव तुजला येइल तेव्हा , येइन प्रिये क्षणात

विरहाचा हा काळ संपता, धरीन तव मी हात

स्वप्न सरोनी होशिल जागी, होइल नवी पहाट

--------------------------------

 

#लेखणीअरुंधतीची-

 

No comments:

Post a Comment