Thursday 2 November 2023

सेल्फी

 

सेल्फी


वीसाव्याही मजल्यावर    आज दिसली काळी मुंगी

चालत होती करून वर   तिची इवल्लिशी ढुंगी

 

कुठुन आली कशी आली    हद्द तिने केली

फुलांच्या पत्त्यावर    गुगलशिवायच पोचली

 

लिफ्टमधे चढेल कशी    का पायर्‍या चढून आली?

शे दोनशे पायर्‍या चढून    कशी नाही दमली?

 

लिफ्टमधे चढेल कशी ?   का पायर्‍या चढून आली?

शे दोनशे पायर्‍या चढून    कशी नाही दमली?

 

दम नाही, धाप नाही     तहानही नाही का लागली?

जिना इतका चढतांना कुठे असेल बसली?

 

बेलही न वाजवता थेट   बाल्कनीत पोचली

फुलणार्‍या फुलांसंगे    हसू खेळू लागली

 

परागांवर लोळून तिने    केली दंगामस्ती

आनंदाने डोलू लागली    फुले वार्‍यावरती

 

घेत उचलून बोटावर तिला     म्हटलं घेऊ या का सेल्फी!

नक्को म्हणे तुझ्यासोबत    मी फुलासोबत घेतली!



#लेखणीअरुंधतीची-

 

 

 

No comments:

Post a Comment